शिक्षकाच्या मृत्यू प्रकरणी फौजदार नागरगोजे अटकेत अंमलदार वाल्मीक बणगेही निलंबित : पोलीस अधीक्षकांची कारवाई

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अखेर मोठी कारवाई झाली आहे. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी मंगळवारी (दि. १६) उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार वाल्मीक बणगे यांना तडकाफडकी निलंबित केले. दरम्यान, बोरसे कुटुंबीयांच्या जबाबानंतर फौजदार नागरगोजेला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे.
२४ मे रोजी वैजापूर ठाण्यात धोंदलगाव येथील रवी आवारे यांच्या फिर्यादीवरून प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या
एकनाथ नागरगोजे
वाल्मीक बनगे
प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे याच्याकडे होता. यातील तिसरा आरोपी संदीप आवारे हा वेरूळ येथे असल्याचे समजल्यावर नागरगोजे आणि बणगे हे खासगी वाहनाने १० जून रोजी वेरूळमध्ये दाखल झाले होते. त्यांच्यासोबतच दुसऱ्या वाहनात फिर्यादीसह वाळू माफियांचे टोळके होते. वेरूळमध्ये त्यांचा शिक्षक सुरेश बोरसे यांच्यासोबत वाद झाला. प्रकरण
ਟਾਨ मारहाणीपर्यंत गेले. यात हृदयविकाराचा झटका येऊन बोरसे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हाभर संताप व्यक्त करण्यात आला.
आठ जणांचे जबाब सोमवारी पोलीस अधीक्षक प्रकाश
जाधव वेरूळच्या बोरसे कुटुंबीयांना भेटले, त्यांनी लहान-थोरांसह आठ जणांचे जवाब नोंदवण्याचे आदेश दिले. प्रत्येकाशी चर्चा करून घटनास्थळी हजर असलेला उपनिरीक्षक नागरगोजे आणि बणगे यांचा नेमका काय निष्काळजीपणा झाला, त्यानी कायदा कसा हातात घेतला, या बाबी स्पष्ट झाल्या त्यानंतर सविस्तर अहवाल मागवून घेत नागरगोजेचाही जबाब नोंदवला त्यानंतर निलंबनाची कारवाई झाली.
कठोर कारवाईचे संकेत मृत शिक्षक सुरेश बोरसे यांच्या
पत्नी अनिता बोरसे यांच्या फिर्यादीवरून खुलताबाद ठाण्यात अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवला. त्यांनी काही आरोपींची नावे निष्पत्र करून रवींद्र रखमाजी आवारे (३४), ओंकार बाबुराव चौधरी (२४), बाळू विश्वनाथ डमाळे (४२. सर्व रा. थोंदलगाव, ता. वैजापूर) आणि सोपान अशोक चोथे (२७, रा. नालगाव, ता. वैजापूर) यांना अटक केली होती. आता या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी कठोर भूमिका घेत बीएनएस १२७ (२), १९०, १९४ (२) आणि १९८ आदी कलमांची वाढ केली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions